जालना / तुकाराम राठोड
पोहरादेवी येथील उपोषणकर्त्यांची आमदार राजेश राठोड यांनी तिसऱ्या दिवशी भेट घेऊन प्रकृती विचारपूस केली.उपोषण करते- राजू फकीरा राठोड,श्याम राठोड, अमोल राठोड, सचिन राठोड यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती आमदार राठोड यांना मिळताच ते तातडीने पोहरादेवीकडे रवाना झाले. यावेळी पोहरादेवी येथे महंत सुनील महाराज,डॉक्टर टीसी राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आमदार राठोड यांनी तहसीलदार,पोलीस प्रशासनाला उपोषणा संबंधित माहिती प्रशासनाला त्वरित कळवावी व प्रशासनाने तातडीने उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य कराव्या नसता उद्भभवणाऱ्या परिस्थितीला शासन जबाबदार राहील असे खडे बोला आमदार राजेश राठोड यांनी तहसीलदारांना सुनावले आहे.









