तुकाराम राठोड /जालना
१जुलै २०२४ रोजी कें.प्रा.शा.सावंगी तलान
येथिल शाळेची शालेय व्यवस्थापन समिती निवडण्यात आली.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित पालकांनी सर्व सदस्य,अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध निवडून दिले व समिती गठीत झाली यामध्ये श्री विठ्ठल मेंढरे यांची अध्यक्षपदी व श्रीमती सोनाली रंधवे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.ऊर्वरित सदस्यांमध्ये श्रीमती लक्ष्मी मेंढरे,मनिषा डोंगरे,सोनाली मेंढरे, वृंदावनी कळकुंबे,शिल्पा राठोड,शोभा खराडे यांची निवड पालक सभेतुन बिनविरोध करण्यात आली.
या प्रसंगी गावातील सरपंच यांचे प्रतिनिधी श्री कमलाकर काका कळकुंबे,माजी अध्यक्ष श्री विठ्ठलसिंग बायस, माजी उपाध्यक्ष श्री अनिल राठोड,केंद्रप्रमुख श्री भागवत जेठेवाड,यांसह सर्व मान्यवर पदाधिकारी व, पालक उपस्थित होते
शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद पवार , शिक्षक श्री प्रमोद साठेवाड, श्रीमती अश्विनी पाटील. यांनी पालकसभे चे उत्कृष्ट नियोजन केले व पालक सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.









