तुकाराम राठोड
प्रतिनिधी/जालना-जिल्यासह तालुक्यातील बंजारा समाज बांधव भक्तिमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत सेवालाल महाराज पायी दिंडी सोहळा बाजीउमृद ते पोहरादेवी आज सकाळी दिंडीचे प्रस्थान झाले आहे.
यावेळी दिंडी चालक देविदास महाराज व दिंडी मधील महिला व पुरुषांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार माजी सरपंच संजय राठोड यांनी केला.यावेळेस उपस्थित सरपंच अतुल चव्हाण,उपसरपंच विष्णू राठोड,संजय डोंगरे,राम राठोड,अनिल पवार,शिवाजी राठोड,सचिन चव्हाण,त्रिंबक पवार,झाबूनाईक पवार व ईतर काही मान्यवर आणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









